साखरवाडी (गणेश पवार)
माढा लोकसभेचे लोकप्रिय खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने सुरवडीतील मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला जगताप वस्ती, घारगेमळा ते पाच सर्कल या ५ किमी लांबीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सदर रस्त्याबाबत पाठीमागील काळात मी मागणी केली होती या मागणीची उचित दखल घेत खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरवडी येथील पाच किमी लांबीचा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत होण्यासाठी मागणी केली या मागणीची तत्काळ दखल घेत या रस्त्यासाठी सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने येत्या काही दिवसात या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले
सुरवडीतील लोणंद फलटण पालखी महामार्गापासून जगतापवस्ती, घारगेमळा, पवारमळा ते पाच सर्कल या पाच किमी रस्त्याचे खडीकरण सुरवडी ग्रामपंचायत मार्फत मागील काळात दोन ते तीन वेळा झाले होते मात्र सद्यस्थितीत खडीकरण पूर्ण उखडल्याने या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यावरून शेतीसह, शालेय विद्यार्थी,खराडेवाडी,मुरूम व परिसरातील नागरिकांची सतत वर्दळ असते त्यामुळे ग्रामस्थ सदर रस्ता होण्याबाबत ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्याकडे वारंवार मागणी करीत होते याबाबत प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून हा रस्ता मंजूर करून घेतल्याने येथील ग्रामस्थांनी प्रल्हादराव साळुंखे पाटील व खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले