साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात " रत्नबन शिष्यवृत्ती " प्रदान समारंभ नुकताच संपन्न झाला .विद्यालयाचे 1987 सालच्या 10 वी बॅच चे माजी विध्यार्थी विरेंद्र जाधव यांनी स्थापन केलेल्या रत्नबन प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जाधव परिवार गेली 3 वर्षे साखरवाडी विद्यालयातील 9 वी उत्तीर्ण हुशार होतकरू विध्यार्थी, विध्यार्थीनीस 11 हजार रुपये रत्नबन शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करत आहेत . यावर्षी विद्यालयातील चैतन्य संतोष भोसले , अक्षरा राजाराम वाघमारे , स्वप्नाली लालासो सोडमिसे , कोमल चंद्रकांत धुमाळ आणि तनिष्का रविंद्र सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, राजेंद्र शेवाळे , राजेंद्र भोसले , मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे , विरेंद्र जाधव , विनोद जाधव , हरिदास सावंत , बबनराव जाधव , रत्नमाला जाधव , रेश्मा जाधव , विद्यालयाचे पर्यवेक्षक तुळशीदास बागडे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी , सर्व विध्यार्थी विध्यार्थीनी व पालक उपस्थित होते . प्रारंभी रत्नबन प्रतिष्ठान चे सचिव तथा विद्यालयातील सहाय्यक शिक्षक हरिदास सावंत यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात प्रतिष्ठान च्या कार्याची माहिती दिली .अध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात प्रतिष्ठान च्या माध्यमातून साखरवाडी विद्यालयासाठी आणखी काही योजना राबविण्याचा मनोदय व्यक्त केला .अध्यक्षीय भाषणात धनंजय साळुंखे पाटील यांनी प्रतिष्ठान च्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास सावंत यांनी केले