साखरवाडी(गणेश पवार)
शिवरौद्र प्रतिष्ठान सामाजिक संस्था नऊ सर्कल, फडतरवाडी या नोंदणी कृत सामाजिक संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी फडतरवाडी गावचे पोलीस पाटील शांताराम काळेल पाटील बोलत होते.
या संपर्क कार्यालयाचे माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, एकत्रित येऊन विचार विनिमय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.शिवरौद्र प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण, दुर्गस्वच्छता मोहीम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, विविध जयंत्या, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, आजारपणामध्ये नागरिकांना सहकार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन पर व्याख्याने, रक्तदान शिबिरे, आरोग्य चिकित्सा शिबीरे आयोजित करण्यात आली. याचा लाभ फडतरवाडी परिसरातील जिंती, साखरवाडी, निंभोरे या भागातील अनेक नागरिकांनी घेतला आहे. युवकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून अशाप्रकारे एकत्र येऊन काम केल्यामुळे चांगली कामे करता आली. याबद्दल या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वैभव राऊत व त्यांच्या सर्व सभासदांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमात मोरेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोरे सर, फडतरवाडी गावच्या सरपंच सौ. उर्मिला काटे, उपसरपंच अनुराज नलवडे, जिंती गावच्या सरपंच सौ. लोखंडे मॅडम, फडतरवाडी गावचे माजी सरपंच संतोष शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य अवित जाधव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम, उपशिक्षक रणवरे सर, गोल्डन रुपनवर, जयंत रुपनवर शिवरौद्र प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सदस्य नेताजी खरात सर यांनी प्रास्ताविक केले व अहवाल वाचन केले. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यालयाचे उद्घाटन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व उपस्थितांची मनोगते झाली. यावेळी मोरेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोरे सर, फडतरवाडी गावचे माजी सरपंच संतोष शेंडगे, मुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली.