साखरवाडी गणेश पवार
सातारा जिल्हातील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरणेबाबतचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. त्यामध्ये आदर्की बु,हिंगणगाव, साठे, गोखळी, हणमंतवाडी,गुणवरे, वडले, गिरवी,तरडगांव, कुसूर,बरड,राजुरी, धुळदेव, वाठार निं. खामगांव, तडवळे व होळ (साखरवाडी). या गावांचा कोतवाल भरतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय फलटण यांच्या दालनात येथे उद्या शुक्रवार, दि. १४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता काढणेत येणार आहे. त्यानुसार संबंधित सजाचे आरक्षण सोडतीसाठी वर नमुद केलेल्या सजातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच संबंधित ग्रामस्थ उपस्थित रहावे, असे आवाहन सचिन ढोले, अध्यक्ष, कोतवाल निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांनी केले आहे.