साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी बडेखान रस्त्यावर खराडेवाडी ता फलटण गावाच्या हद्दीमध्ये दि १३ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी स्वाराला टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला याबाबत घटनास्थळ व लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी सुरेंद्र किसन भोसले (वय 55 रा साखरवाडी ता फलटण) हे आपल्या दुचाकीवरून साखरवाडीकडून बडेखानला जात असताना खराडेवाडी गावाच्या हद्दीत रेल्वे पटरीच्या अलीकडे टँकर क्र एम एच १६ क्यू ७१६५ या टँकरने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद अरुण नलवडे रा जिंती ता फलटण यांनी दिली असून टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातात घडल्यावर यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती यावेळी खराडेवाडीचे पोलीस पाटील सोमनाथ जगताप यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून या अपघाताची माहिती दिली त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी लोणंद पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम,अमोल पवार व त्यांचे सहकारी दाखल झाले व त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद येथील शासकीय रुग्णालयात पाठवला सुरेंद्र भोसले हे साखरवाडीच्या श्रीदत्त इंडिया साखर कारखान्यात इलेक्ट्रिक विभागात वायरमन म्हणून कार्यरत होते त्यांच्या आकस्मित मृत्यूने साखरवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.