साखरवाडी गणेश पवार
लोणंद पोलिसांनी एका अल्पवयीन सहित तीन दुचाकी चोरांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत संशयित पुनीत सुरेश दुरगुडे (वय २८ रा सावतामाळी मंदिराशेजारी लोणंद), वैभव गोपाळ गोवेकर (वय २० रा कोरेगाव ता फलटण) व एक अल्पवयीन अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत
याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार लोणंद पोलीस ठाण्यात दिनांक ९ जुलै व ११ जुलै रोजी दुचाकी चोरी झाल्याच्या घटनांची नोंद झाली होती याबाबत लोणंद पोलिसांनी लोणंद शहर व फलटण रोडवरील सीसीटीव्ही व माहितीच्या आधारे तपास करून एका अल्पवयीन सहित तिघांना जेरबंद केले आहे सदर कारवाई मध्ये लोणंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार चंद्रकांत काकडे, संतोष नाळे, पोलीस नाईक नितीन भोसले, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, सतीश दडस, अभिजीत घनवट, केतन लाळगे व महिला कॉन्स्टेबल मेघा ननवरे यांनी सहभाग घेतला होता