साखरवाडी(गणेश पवार)
सुरवडी तालुका फलटण येथील जगताप वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून महेश बबनराव जगताप याची महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पीएसआय पदी तर त्याचाच मोठा भाऊ गणेश बबनराव जगताप यांची मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे
महेश जगताप याच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे साखरवाडी येथील शाळेत झाले असून मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे तर पदवीचे शिक्षण त्याने दापोली येथील कृषी महाविद्यालयात घेतले आहे लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या महेशने २०२० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती याचा निकाल दिनांक ४ जुलै रोजी लागला यामध्ये त्याची पीएसआय पदी निवड झाली आहे तर गणेश जगताप यांनी याआधी सुमारे १७ वर्ष देशाची सेवा केली असून नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरतीत त्यांची पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे शेतकरी कुटुंबातील दोन सख्या भावंडांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने सुरवडी ग्रामस्थ व सावता माळी तरुण मंडळ जगताप मळा येथील नवयुवकांनी दोघांची वाजत गाजत मिरवणूक काढली महेश व गणेश या दोघांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने सुरवडीसह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.