साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात आषाढ शुध्द पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे यांनी गुरूप्रतिमेचे पूजन केले. शालेय विध्यार्थी विद्यार्थिनीनी गुरुमहती सांगणारे गीत व गुरू विषयी मनोगते व्यक्त केली .विद्यालयातील सहाय्यक शिक्षक हरिदास सावंत , पर्यवेक्षक तुळशीदास बागडे आणि मुख्याध्यापिका जगदाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले प्रातिनिधिक स्वरूपात संत श्री निवृत्तीनाथ आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली या गुरू शिष्य जोडीची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून गेली. ही संकल्पना हरिदास सावंत यांची होती .त्यांना श्री महादेव चव्हाण, गावीतसर , गांगुर्डेसर आणि रासकरसर यांनी मदत केली. पसायदान म्हणून कार्यक्रम संपन्न झाला.तत्पूर्वी सहाय्यक शिक्षक कुंभार सर यांनी आभार मानले. सांस्कृतिक समिती प्रमुख सावंतसर , समिती सदस्य युवराज बोबडेसर, कुंभारसर ,जगतापमॅडम, गायकवाडमॅडम आणि विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम सहकार्य केले !