साखरवाडी (गणेश पवार)
मुंजवडी ता.फलटण जि.सातारा येथे गांजाची विक्री करण्याकरीता आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ५ लाख रुपये किमतीचा २० किलो गांजा व १ लाख रुपये किमतीच्या मोटार सायकल असा एकूण ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित बाळू गणपत कदम वय ५१ वर्षे रा कुरबाबी ता माळशिरस जि सोलापूर व बालासो रामचंद्र रणदिवे वय ५० वर्षे रा मुंजवडी ता फलटण जि सातारा
अशी अटक करण्यात आलेल्या संशोधनांची नावे आहेत याबाबत समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणारे इसमांचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
दि.०३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम युनिकॉन मोटार सायकलवरुन मुंजवडी ता. फलटण जि.सातारा गावातील माध्यमिक शाळेजवळ अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना नमुद इसमास ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून नमुद इसमास व खरेदी करण्याकरीता आलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्या इसमांच्या कब्जात एकूण ५ लाख रुपये किमतीचा २० किलो गांजा तसेच १ लाख रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचेविरुध्द फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं. १३५४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब) (ii) (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.