![]() |
साखरवाडी गणेश पवार
आज दुपारी संपुर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असताना महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेही राजभवनात उपस्थित होते व त्यांनी अजितदादांच्या या भूमिकेला पाठिंबा असल्याचे जाहीर केले त्यामुळे भविष्यात तेच पुन्हा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होणार असल्याबाबत श्रीमंत रामराजे यांच्या समर्थकांनी सोशल माध्यमातून स्टेटस व पोस्ट टाकून श्रीमंत रामराजे हे सभापतीपदी विराजमान होणार असल्याचे टाकल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदी श्रीमंत रामराजे परत विराजमान होणार का? याकडे आता फलटण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे