Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली पालखी तळाची पाहणी palkhi tal pahani

 



साखरवाडी (गणेश पवार)

 श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा उद्या दि 21 रोजी फलटण येथील पालखी तळावर मुक्कामी येत असताना सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये याकडे प्रशासनाने विषेश भर द्यावा, अशा सूचना फलटण नगर परिषदेचे  विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.


आज दिनांक १९ रोजी सायंकाळी सहा वाजता फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विमानतळ येथील पालखी तळावर भेट दिली यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, आरोग्य विभाग प्रमुख विनोद जाधव, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता सचिन कोरडे व भरत खिलारे, शाखा अभियंता शरद येळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.


यावेळी पालखी तळावरील वीज,पाणी,रस्ते वगैरे उपाययोजनांची माहिती घेतली तसेच दिव्यांग व 80 वर्षावरील वृद्धांना पालखी दर्शनाची विशेष सोय करून देण्याची सूचना यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.शहरात महावितरण ने वीज वहिनी खालील तोडलेल्या झाडांचा राडारोडा अनेक भागात रस्त्यालगत पडला असून तो तत्काळ उचलण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


पालखी तळावर उभारण्यात आलेल्या शौचालय व्यवस्थेची तसेच दर्शन रंग याची माहिती घेत पालखी तळावर अस्वच्छता होणार नाही याची दक्षता नगरपरिषदेने घ्यावी असे यावेळी मुख्याधिकारी यांना सांगण्यात आले. दरम्यान सायंकाळी पहाणीनंतर श्री संत गाडगे महाराज रथ यात्रा सोहळा समिती या दिंडीची आरती समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा, सचिन कांबळे पाटील, निलेश चिंचकर, सागर शहा, मिलिंद भोसले, राहुल शहा, शंभूराज बोबडे, निखिल उपाध्ये व ईतर कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.