भारतातील साखर उद्योगातील अग्रगण्य कंपनी श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगसमूहाचे संचालक जितेंद्र धारू यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 19 रोजी साखरवाडी येथील कारखाना कार्यस्थळावर कंपनीच्या श्री गणेशोत्सव मंडळ व फलटण तालुका साखर कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 240 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून आजपर्यंत परिसरात झालेल्या रक्तदानाचा हा आकडा उच्चांकी असल्याचे कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले.
दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजता कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला यावेळी कंपनीचे केन मॅनेजर सदानंद पाटील,चीफ इंजिनीअर अजित कदम,कंपनीचे एच आर विराज जोशी, ऋतुराज पाटील,फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले, सुहास गायकवाड, पोपट भोसले, संजय जाधव,पै संतोष भोसले,पै महेश भोसले, को जन मॅनेजर दीपक मोरे,शेतकी अधिकारी रमेश बागणवर, ऊस विकास अधिकारी साठे, डिसलरीचे प्रोसेस मॅनेजर अजित जगताप, डेप्युटी चीफ केन मॅनेजर दिगंबर माने, सुरक्षा अधिकारी अजय कदम, चीफ केमिस्ट नितीन नाईकनवरे, डेप्युटी चीफ इंजिनिअर नितीन रणवरे, किशोर फडतरे, श्री गणेशोत्सव मंडळ(श्रीदत्त इंडिया)अध्यक्ष गोरख भोसले, केन यार्ड सुपरवायझर एस के भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले,मंडळाचे कार्यवाहक दिलीप भोसले,विजय माडकर,दत्तात्रय जाधव, अरुण इंगळे, बाळासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कंपनीचे सर्व कामगार,अधिकारी वर्ग व कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला.