विडणी (योगेश निकाळजे) - श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सध्या फलटण तालुक्यात आला असून उद्या गुरुवार दि22 रोजी हा सोहळा फलटण वरून बरडकरकडे प्रस्थान करताना सकाळी विडणी येथे विसाव्यासाठी थांबणार असून विडणी ग्रामपंचायती च्यावतीने वारकऱ्यांना विविध सुखसुविधा पुरवण्यासाठी मोठी जय्यत तयारी केली आहे.
ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत व टाळ मृदुगांचा गजर करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सध्या एकूण प्रवासाच्या मध्यभागी म्हणजेच फलटण याठिकाणी आज बुधवारी विसवणार असून एका दिवसाचा फलटण येथील मुक्काम आटपून हा पालखी सोहळा उद्या गुरुवार दि 22 रोजी सकाळी विडणीमार्गे बरडगावी मुक्कामासाठी थांबणार आहे तत्पूर्वी विडणी याठिकाणी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबणार असून वारकऱ्यांसाठी विडणी ग्रामपंचायतीच्यावतीने विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत यामध्ये वारकऱ्यांच्या अंघोळीसाठी सुमारे शंभर शॉवर लावण्यात आले असून यामध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र सोय केली आहे , वारीतील भाविकांना आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पाँईट काढण्यात आला आहे तसेच शंभराहून अधिक महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र फिरती शौचालयांची सोय करण्यात आली आहे यासह पाणीपुरवठा फिलींग पाँईट काढण्यात आला आहे तसेच सेल्फी पाँईट ,हिरकणी कक्ष , ओला व सुका कचऱ्याचे नियोजनासाठीही सोय करण्यात आली आहे तसेच पालखी तळाचा परिसरही सुशोभिकरण करण्यात आला असून वारकऱ्यांसाठी महात्मा फुले युवक संघटना यांच्या वतीनेही चहा पाणी नाष्ट्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती विडणीचे युवा सरपंच सागर अभंग यांनी दिली आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीच्यावतीने वारकऱ्यांसाठी केलेल्या सुख सुविधांमूळे भाविक व वारकरी वर्गामधून समाधान व आनंद व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.