साखरवाडी(गणेश पवार)
फलटण-लोणंद रस्त्यावर पायी जात असताना कारने माय- लेकीला पाठिमागून धडक दिल्याने एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. अनुषा देवानंद कांबळे (वय १) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. अनुषा व तिची आई वैशाली या दोघी फलटण-लोणंद रस्त्यावरून पायी निघाल्या होत्या. या दोघी तरडगावच्या हद्दीत आल्या असता या दोघींना पाठिमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघीही काही फूट उडून पडल्या. यामध्ये अनुषा ही गंभीर जखमी झाली. शनिवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई वैशाली यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.