साखरवाडी(गणेश पवार)
गिरवी, ता. फलटण येथे अनधिकृतपणे पोलवर आकडा टाकुन वीज चोरी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन सोपान निकाळजे, गोरख दादासो कदम, गुणवंत साहेबराव निकाळजे व बापूराव हरिबा जाधव सर्व रा गिरवी ता फलटण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या चौघांनी 28 हजार 194 रूपयांची वीज चोरी गेली आहे. याप्रकरणी भरत बाबाजी भोसले यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर करीत आहेत.