साखरवाडी गणेश पवार
मुंजवडी ता फलटण गावातून दि 23 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास विवाहित दाम्पत्य बेपत्ता झाल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 23 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अजित बाबुराव ठनके (वय 35) व सोनाली अजित ठनके (वय 32) हे विवाहित दांपत्य आटोळे वस्तीवर जातो असे सांगून राहत्या घरातून निघून गेल्याचे व परत माघारी न आल्याची फिर्याद बापूराव बाबुराव ठनके यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे