साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीतून दिनांक 16 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सनी बाळू खोमणे वय 25 हा युवक पॅन कार्ड वरील नावात बदल करण्यासाठी फलटणला जातो असे सांगून घरातून निघून गेला असून परत माघारी आला नसल्याने छाया बाळू खोमणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहेत