साखरवाडी(गणेश पवार)
बावकलवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दिड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे शेंडगेवस्ती येथील महादेव पांडुरंग शेंडगे यांच्या घराचे कुलूप दि. २६ रोजी भरदिवसा अनोळखी चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील ४२ हजारांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असे मिळून सुमारे एक लाख पंचेचाळीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद महादेव शेंडगे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे.पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.