साखरवाडी(गणेश पवार)
सुरवडी ता फलटण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग फलटण यांच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त महिला सन्मान दिनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते यामध्ये सुरवडी गावातील महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता सदर कार्यक्रमांमध्ये मंडल अधिकारी सतीश निंबाळकर यांनी सेंद्रिय शेती जमिनीचे आरोग्य तसेच प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले राजेंद्र पालवे यांनी पिक विमा तसेच शेतकरी अपघात विमा या विषयावरती मार्गदर्शन केले राहुल कांबळे कृषी सहाय्यक यांनी खरीप हंगामाला सामोरे जाताना बियाणे निवड बीज प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक अरविंद नाळे यांनी केले कार्यक्रमाला सुरवडीसह पंचक्रोशीतील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.