साखरवाडी (गणेश पवार) वाखरी ता फलटण येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास वाखरी गावाच्या हद्दीत फिर्यादी महिलेच्या घरी संतोष दादा ढेकळे, संदीप नागू ढेकळे, सचिन नागु ढेकळे (सर्व रा. वाखरी ता. फलटण) हे फिर्यादी यांचे दाराबाहेर उभे राहून आवाज दिली असता फिर्यादी या घरातून बाहेर आले त्यावेळी ते म्हणाले की तुझा नवरा दत्तात्रय व मुलगा केतन कोठे आहे त्यावेळी फिर्यादी यांनी सांगितले की ते बाहेर गेले आहेत तुम्हा सर्वांना लय मस्ती आलिया असे म्हणून शिवीगाळ केली व यातील संतोष ढेकळे व सचिन ढेकळे या दोघांनी फिर्यादी महिलेचा साडीचा पदर ओढल्याने फिर्यादीचे मनासलज्जा उत्पन्न झाली. याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष दादा ढेकळे, संदीप नागू ढेकळे, सचिन नागु ढेकळे या तिघांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.