Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

केंद्रीय प्रदूषण नियंत्रक पथकाकडून नीरा नदीची पाहणी pahani

  


 

 साखरवाडी(गणेश पवार)

 नीरा ता बारामती  ते सोनगाव  या ५० किलोमीटर अंतरामधील नीरा नदीच्या पाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत.

       पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातून वाह नाऱ्या नीरा नदी प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रक पथक दाखल झाले आहे. नीरा नदी काठी असलेल्या कारखाने व नदी लगतच्या गावचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नीरा नदी मध्ये सोडले जाते त्याचे दुष्परिणाम जलचर व लगतच्या गावांना होत आहेत .

           या  पथकाबरोबर पुरंदर बारामती व इंदापूर चे तहसीलदार प्रांतअधिकारी यांच्या समवेत ग्रां, निंबुत सरपंच निर्मला काळे उपसरपंच अमर काकडे सो.का. मा संचालक महेश काकडे युवा नेते गौतम काकडे  उदय काकडे विजय काकडे नंदकुमार काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

            सकाळी ९ वाजता निंबुत नाजिक आनंद व लक्ष्मीनगर येथील भागात नदी प्रदूषणामुळे मृत पावलेल्या माशांची पाहणी करून स्थानीक लोकांशी संवाद साधला.

संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश या पथकाने दिले आहेत. यामध्ये नीरा शिवतक्रार, निंबुत, मुरूम, होळ, सांगावी, नीरावगज, सोनगाव आदी गावातील नीरा नदीच्या पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.