साखरवाडी(गणेश पवार)
फडतरवाडी तालुका फलटण
गावातील सई फडतरे हिने मागील दोन वर्षात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विविध चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादित केले असून लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या सईने आजपर्यंत वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन उत्तुंग भरारी घेत प्रथम पारितोषिके मिळवली असून तिला या यशात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार चंद्रकांत फडतरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तिने सांगितले