साखरवाडी(गणेश पवार)
सुरवडी ता फलटण ग्रामपंचायतच्या विकास कामांची वाटचाल जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील नेतृत्वाखाली व धनंजय साळुंखे, जितेंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आज गावातील मुख्य चौकांमध्ये सी .सी. टी .व्ही.कॅमेरे बसवले असून भविष्यात संपूर्ण सुरवडी गावात सी सी टी व्ही बसवले जाणार असल्याचे सरपंच शरयू साळुंखे- पाटील यांनी सुरवडी गावातील प्रमुख चौकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले यावेळी ग्रामसेवक एस आर राऊत, उपसरपंच विजय खवळे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,कर्मचारी वृंद उपस्थित होते.