तरडगाव(नवनाथ गोवेकर)
मांढरदेव डोंगरावर अचानक मेघ गर्जनेसह आलेल्या पावसाने भाविकांची तारांबळ उडाली आज शुक्रवार असल्याने मांढरदेव डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.डोंगरावर सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मेघ गर्जनेसह मुसुळधार पावसाने हजेरी लावली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. भाविकांनी हार, फुले, प्रसाद इ. दुकानांचा आधार घेतला. पावसाचे पाणी काही प्रमाण दुकानामध्ये गेल्याने पूजेचे साहित्य भिजल्याने व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.
मंदिराच्या मुख्य मार्गावर रेलिंग चे काम सुरू असल्याने पर्याय मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र पावसाने पर्यायी मार्गावर चिखल झाल्याने भाविकांचे हाल झाले.