Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सांगवी ता फलटण विकास सोसायटी चेअरमनचा कारनामा सोसायटीच्या मालकीची जमीन परस्पर विकली vikali

 


साखरवाडी(गणेश पवार)

 सांगवी ता फलटण येथील सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड च्या नावे असणारी सांगवी येथील 94 गुंठे जमिनीची विक्री सांगवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड चे चेअरमन महादेव विश्वनाथ कदम यांनी परस्पर सोसायटीचा विक्री ठराव तसेच जिल्हा निबंधक तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची परवानगी नसताना 80 ते 90 लाखांची जमीन 8 लाख दहा हजार रुपये किंमतीत जमिनीची विक्री परस्पर केल्याची घटना घडली असुन याबाबत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही.


याबाबत तक्रारदार ॲड. हनुमंत शिवाजी जाधव यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, मौजे सांगवी तालुका फलटण येथील गट नंबर 880 मधील 94 गुंठे शेत जमीन चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड सांगवी यांच्या नावे होते सदर जमिनीवर इतर हक्कात "कु. का. क बेकायदेशीर व्यवहार" अशी नोंद तसेच "सहकारी सोसायटी ई करार" व "विकास सो. सांगवी 80 हजार जप्ती आदेश" तसेच "श्रीमंत मालोजीराजे बँक बोजा करिता जमीन जप्त" असा शेरे इतर हक्कात  असताना दिनांक 20 मार्च 2023 रोजी सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड सांगवी चेअरमन महादेव विश्वनाथ कदम (राहणार .सांगवी, तालुका फलटण) यांनी स्वप्नील राजीव धिवार (राहणार सांगवी, तालुका फलटण) यांना बाजारभावाने किंमत 80 लाख ते 90 लाख असताना सरकारी किंमत आठ लाख रुपये किंमत दाखवून निव्वळ आठ लाख दहा हजार रुपये किंमत ठरवून त्यापैकी आठ लाख रुपये 20 मार्च 2023 रोजी साठेखत वेळी चेअरमन महादेव कदम यांनी चेकने स्विकारत विक्री केली व उर्वरित दहा हजार रुपये रक्कम खरेदी खतवेळी देण्याचे साठे खतात कबूल केले.


मुळात सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा  सोसायटी लिमिटेड चेअरमन महादेव विश्वनाथ कदम यांनी सदरच्या साठे खतासोबत सांगवी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड सांगवीचा कोणत्याही प्रकारचा साठेखत तसेच विक्री व्यावहार बाबत ठराव जोडला नाही तसेच इतर हक्कातील "कु. का. क बेकायदेशीर व्यवहार शेरा कमी करण्याबाबत महसूल विभागाचा आदेश जोडला नाही याचबरोबर जिल्हा निबंधक सहकारी संस्था सातारा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांची जमीन विक्री परवानगी बाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. 


तसेच श्रीमंत मालोजीराजे बँकेचा बोजा जमीन जप्ती हा शेरा असतानाही तो शेरा कमी करणे बाबत अथवा विक्री व साठेखत बाबत कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी अथवा ना हरकत घेतली नाही असे असताना दिनांक 20 मार्च 2023 रोजी सदरच्या जमिनीची दुय्यम निबंधक फलटण यांच्या सोबत परस्पर साठेखताच्या आधारे विक्री केली आहे. याबाबत सांगवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड सांगवी चे सचिव दत्तात्रय बंडगर अथवा संचालक मंडळ यांना याबाबत सर्व प्रकार माहित असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव दत्तात्रय बंडगर यांनी दिली आहे.


एखाद्या विविध कार्यकारी सोसायटीच्या नावे असलेली मिळकत परस्पर चेअरमन कदम यांनी विक्री केल्याने फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणी सखोल चौकशीची आवश्यकता असून चौकशी अंतिम या जबाबदार असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी तसेच दुय्यम निबंधक कार्यालय ज्या कार्यालयात कोणतेही प्रकारच्या विक्री परवानगी अथवा बोजा कमी करणे बाबतचे पत्र नसताना व्यवहार करण्यात आला तसेच सोसायटीची संचालक मंडळ व सचिव यांनी सदरचा व्यवहार हा झालेला माहीत असतानाही कोणत्याही प्रकारची हरकत अथवा तक्रार संबंधित सहकार विभागाकडे दाखल केली नाही. त्यामुळे एक प्रकारे ह्या व्यवहाराला मुकसंमती दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते अशा सर्वावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे.


सदर प्रकरणी सोसायटी च्या संचालक मंडळाने व सचिवांनी चेअरमन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असून सदर व्यवहारात स्वीकारलेले आठ लाख रुपयांचे काय झाले व चेक कोणाच्या नावे देण्यात आला व तो कोणाच्या खात्यात भरून ती रक्कम काढण्यात आली याचीही सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सदर साठेखत व्यवहार हा रद्द करणेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सक्षम न्यायालयात साठेखत रद्द करून फसवणूक प्रकरणी जबाबदार अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारदार हे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता ग्रामीण पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असून या घटनेत शहर पोलीसांची भूमिका ही संशयास्पद आहे.





साठेखतात संचालकाच्या साक्षीदार म्हणून सह्या


सदर प्रकरणी झालेल्या साठेखतात खुद्द साक्षीदार म्हणून दिलीप लक्ष्मण सस्ते व दत्तात्रय गणपत मोहिते यांनी सह्या केल्या आहेत यामुळे या विक्री व्यवहारात कुणाकुणाचा व कसा सहभाग आहे याचा उलगडा चौकशी होण्याची आवश्यकता आहे.





सदर व्यवहारात सचिवाची मूक संमती


सचिव दत्तात्रय मधुकर बंडगर यांना जमीन विक्री  व्यवहाराची माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची तक्रार सहकार विभागाकडे केली नाही तसेच याबाबत हरकत घेतली नाही त्यामुळे संपूर्ण संचालक मंडळ सहसचिव दत्तात्रय बंडगर यांची भूमिका संशयास्पद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.