विडणी - (योगेश निकाळजे) -शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सुरु होत असून या यात्रेत तेल्या भुत्याच्या कावडीचा मान असल्याने सासवडहून शिंगणापूरकडे निघालेल्या या कावडींचे विडणी येथे मोठ्या उत्साहात भाविकांनी स्वागत केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सुरू होत असल्याने या यात्रेमध्ये सासवड ता.पुरंदर येथील तेल्या भुत्याच्या कावडीला मानाचे स्थान असून ही कावड सासवड येथून शिंगणापूर जात असताना आज शनिवार रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विडणी येथे आगमन झाले यावेळी विडणी येथील भाविकांनी उत्साहात स्वागत करुन कावडीचे दर्शन घेतले यावेळी तेल्या भुत्या कावडीचे मानकरी कैलास काशिनाथ कावडे (महाराज) यांच्या हस्ते आरती करण्यात आली ग्रामस्थांच्यावतीने कावडीसोबत आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात आले.
तेल्या भुत्याची कावडीसह इतरही कावडी यामध्ये सहभागी असतात ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली असून विडणी येथीलही अनेक कावडी सहभागी होऊन पुढे शिंगणापूरकडे रवाना होतात,आज विडणी येथून 4 वाजता या सर्व कावडी कोथळे या गावी मुक्कामास जातील त्यानंतर उद्या रविवारी या सर्व कावडी शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटातून मंदिराकडे प्रस्थान करणार असून या कावडींबरोबर मोठया संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.