साखरवाडी(गणेश पवार) श्रीमंत रघुनाथराजे ना निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचेच काम केले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणी परस्पर उमेदवारी अर्ज भरला तर त्यांचा विचार केला जाणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले .
कृषी उत्पन्न बाजार समिती,फलटण पंचवार्षिक निवडणूक २०२३च्या निमित्ताने ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, व्यापारी, कामगार, मापाडी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आज कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते . यावेळी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , जि.प.सातारा चे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती डाॅ.विजयराव बोरावके दत्तोपंत रणवरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर , महानंदचे संचालक .डी.के.पवार , वसंतराव गायकवाड, नरेंद्र भोईटे तसेच मंचावरील इतर मान्यवर नेते, पक्षाचे पदाधिकारी, ग्रा.पं सदस्य, विकास सेवा सोसायटीचे सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.