प्रशिक्षण शिबिरात सहभागी विद्यार्थी ट्रेनर व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डाॅ नरेंद्र नार्वे व इतर प्राध्यापक
साखरवाडी(गणेश पवार)
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथम वर्ष डिग्री व डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच गरजेची असनारी कौशल्य विद्यार्थ्यांना विकसित करता यावीत या उद्देशाने महाविद्यालयाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते . शाश्वतग्यान फाउंडेशनचे प्रशिक्षकांनी सलग पाच दिवस या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांज्या जडणघडणीमध्ये कौशल्य विकास खुप महत्वाचे असुन महाविद्यालयाच्या वतीने चांगले प्रशिक्षण नेहमीच दिले जाते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डाॅ. नरेंद्र नार्वे यांनी दिली