साखरवाडी(गणेश पवार)
सरडे तालुका फलटण येथे गोरक्षकांनी दि 9 रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास जनावरांची अवैद्य वाहतूक करणारा आयशर टेम्पो व पिकअप अडवून फलटण ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन एका अल्पवयीन बालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला असून सुमारे 27 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून टेम्पो व पिकअप मधून एकूण 41 लहान वासरे, 1 म्हशीचे लहान रेडकू, 4 मोठ्या गाई, 3 मृत वासरे एक पिकअप क्र एम एच 42 एम 4275 व एक आयशर टेम्पो क्र एम एच 42 0970 असा एकूण 27 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून संशयतांवर फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन बालकासह साकीब जावेद शेख वय 20 रा देवळे इस्टेट बारामती,पिकअप चालक अमीर हाजी शेख वय 20 रा निरा वागज ता बारामती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश खरात यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी करीत आहेत