साखरवाडी(गणेश पवार)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र मलटण येथे स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक १२ एप्रिल ते मंगळवार दिनांक १८ एप्रिल या सप्ताह काळात पुढीप्रमाणे कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. बुधवार दिनांक - १२ एप्रिल २०२३ पासुन स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप, स्वामीचरित्र वाचन, प्रहर सेवा सुरू होणार आहे.
बुधवार दिनांक १२एप्रिल - सकाळी १०: ०० वाजता गुरुचरित्र पारायण सुरु होईल.
दुपारी ४:०० वाजता हवन युक्त वेगवेगळे पाठ तसेच दररोज सकाळी ठीक ७.०० वाजलेपासुन मंदिरात अखंड नामजप, स्वामी चरित्र वाचन आणि वीणा वादन १०.०० ते १२.०० या काळात गुरूचरित्र पारायण संध्याकाळी ४ वाजता रोज पुढीप्रमाणे हवन युक्त पाठ होतील --:
बुधवार - १२स्वामी चरित्र पारायण .
गुरुवार - १३ स्वामी चरित्र पारायण.
शुक्रवार - १४श्री दुर्गासप्तशती पाठ.
शनिवार - १५श्री नवनाथ भक्तीसार.
रविवार - १६ श्री मल्हारी सप्तशती पाठ.
सोमवार - १७ - श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम्.
मंगळवार - १८ सकाळी १०.३० च्या आरती नंतर हवनयुक्त स्वामी चरित्र सारामृत पारायण.
त्यानंतर दुपारी किर्तनाचा कार्यक्रम रोज प्रदक्षिणा घेतली जाईल
दुपारी ४ ते ६
आबा महाराज मोहिते मुळीकवाडी स्वामी समर्थ महाराज चरित्र विषय कीर्तन
महाप्रसाद - ७ ते ९ यावेळेत होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.