साखरवाडी(गणेश पवार) फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जनाधार नसलेल्या काही लोकांनी उगीचच लादली असून आपल्या सर्वांच्या एकजुटीची ताकद मतदानाच्या रूपाने त्यांना दाखवण्याची वेळ आली असून मतदानातून अशा अपप्रवृत्तींना त्यांची जागा दाखवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खामगाव पाच सर्कल येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात आयोजित श्रीराम पॅनेलच्या प्रचार सभेत केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महानंदाचे संचालक डि.के. पवार, फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव रणवरे, जिंतीचे उपसरपंच शरद रणवरे, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे माजी अध्यक्ष गोकुळतात्या रुपनवर, निंभोरेचे उपसरपंच मुकुंद रणवरे, मातोश्री कंट्रक्शन चे संजय भोसले, होळ विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोसले ,व्हा चेअरमन चंद्रकांत जाडकर, साखरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले ,दत्तात्रय वाघ, हरीश गायकवाड, अभयसिंहराजे निंबाळकर, तंटामुक्ती उपाध्यक्ष दिलीप बाबा पवार, खामगाव चे माजी सरपंच नितीन जगताप,प्रकाश पवार, श्रीराम पॅनलचे बिनविरोध उमेदवार निलेश कापसे, संतोष जगताप, अक्षय गायकवाड, तुळशीराम शिंदे श्रीराम पॅनलचे उमेदवार ज्ञानदेव गावडे, दीपक गौंड, शंभूराज पाटील, शरद लोखंडे, चेतन शिंदे, सुनिता रणवरे, जयश्री सस्ते, भीमराव खताळ, चांगदेव खरात, किरण शिंदे आदी मान्यंवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले,श्रीमंत रघुनाथराजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना माफक दरामध्ये पेट्रोल डिझेल मिळावे यासाठी पेट्रोल पंपांची निर्मिती केली तसेच अनेक ठिकाणी गाळे बांधुन, विविध फळांची बाजारपेठ उभारुन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. यामुळे या बाजार समितीचे नाव राज्यांमध्ये झाले व या बाजार समितीला “अ” वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.गेली अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार श्रीमंत रघुनाथराजे यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविल्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करून यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची गरज होती मात्र जनाधार नसलेल्या काही अपप्रवृत्तींनी उगाचच ही निवडणूक लादली आहे
प्रारंभी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, डी के पवार,फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रवीण रणवरे यांनी केले.