साखरवाडी(गणेश पवार)
बुद्धांकूर तरुण मंडळाच्या वतीने पिंप्रद,ता. फलटण येथे 132 वी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंप्रदची भीम जयंती 3 दिवस साजरी केली गेली, दिनांक 21 पासून जयंती ला सुरवात झाली, ह्या दिवशी भीम गीतांचा सुरेल असा ऑर्केष्ट्रा सादर झाला.त्यानंतर 22 तारखेला संध्याकाळी महाभोजन दान कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक 23 एप्रिल रोजी 4.00वाजता विविध स्पर्धा व पारंपरिक खेळ घेण्यात आले . त्यानंतर 6.30 वाजता माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले,आयकर आयुक्त तुषार माहिते, वीज महावितरण मधले योगेश मोरे,पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे आणि ठाणे पोलीस अभिजित मोरे, अभिनेता रवींद्र पालखे त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रला खळ खळून हसवणारे तसेच वेबसिरीज च्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे.. चांडाळ चौकडी च्या संपूर्ण टीम नी हजेरी लावून कार्यक्रमाला शोभा वाढवली.यावेळी विश्वासराव भोसले,तुषार मोहिते यांनी आपापली मत व्यक्त करून मार्गदर्शन केले तसेच चांडाळ चौकडी च्या टीम ने देखील समाज प्रबोधन वर भाषणे केली. या तीन दिवसाच्या जयंती च्या कार्यक्रमात बुद्धांकूर तरुण मंडळाने 132व्या जयंती निम्मित 132 वृक्ष वाटप केले तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि डॉ. आंबेडकरांचे जातीव्यवस्थेचे निर्मूलन हीं पुस्तके वितरित केली आणि विशेष म्हणजे बुद्धांकूर तरुण मंडळाच्या वतीने पिंप्रद मध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरू इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सिद्धार्थनगर मधील विध्यार्थ्यांना वही, पेन वाटप केले आणि अश्या गरीब होतकरू विध्यार्थ्यांना कायम स्वरूपी शालेय शिक्षणासाठी दत्तक घेतले असून त्यांचा सर्व खर्च बुद्धांकूर तरुण मंडळ करणार आहे.अश्या रीतीने पिंप्रद मधील सर्व तरुण मंडळे हजर होऊन जयंती उत्सव थाटात साजरी करण्यात आली