विडणी -(योगेश निकाळजे) -
विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मारूती आण्णासाहेब नाळे व व्हाईस चेअरमनपदी साहेबराव भाऊसो ननावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील नावलौकिक व आर्थिकदृष्टया विकसनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत असलेल्या उत्तरेश्वर पॅनेल व भाजपप्रणित विडणी विकास आघाडी यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये उत्तरेश्वर पॅनेलने सर्वच जागा ( 0.13 ) जिंकून विडणी सोसायटीवर आपली सत्ता अबाधित ठेवली.
आज चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची निवड करण्यात आली असून यामध्ये मारुती आण्णासाहेब नाळे यांची चेअरमनपदी तर साहेबराव भाऊसो ननावरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली, या निवडी बदल माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक - निंबाळकर,श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे ,डॉ.उत्तमराव शेंडे,सहदेव शेंडे,उपसरपंच सुनिल अब्दागिरे, सोसायटीचे मॅनेजर मधुकर नाळे,राजीव पवार,किशोर ननावरे तसेच सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ यांनी दोघांचेही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.