साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथे श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या बैलगाडी गेट समोर वडाच्या झाडाखाली सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून संशयित रणधीर मारुती कदम वय 52 राहणार सात सर्कल साखरवाडी व सागर देविदास अहिवळे वय 52 राहणार मंगळवार पेठ फलटण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून 1155 रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहेत