Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाखरी ता फलटण गावची यात्रा रद्द यात्रा काळात प्रांताधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश aadesh

 


साखरवाडी(गणेश पवार)

 वाखरी  ता . फलटण गावची  दि १२ एप्रिल ते १७ एप्रिल रोजी साजरी होणारी यात्रा   गावातील दोन्ही गटाचा वाद न मिटल्याने फक्त    पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत  धार्मिक कार्यक्रमाने पार पडणार असून प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी यात्रा काळात गावामध्ये जमाबंदीच्या आदेश लागू केले आहेत प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार, गावात  यात्रेवेळी दोन्ही गटात भांडणे होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच गावातील दोन्ही गट हे एकमेकांचे ऐकण्याचे स्थितीत नसल्याने देवाच्या हळदीचा कार्यक्रम , देवाचे लग्नसोहळा या कार्यक्रमास मंदिरातील पुजारी व मानकरी वगळून सदर कार्यक्रमास इतर लोकांना मनाई करण्यात येत असल्याने देवाचा छबीना काढण्यास मनाई केली आहे. सदर कालावधीमध्ये मौजे वाखरी गावामध्ये कोणतेही करमणूकीचे कार्यक्रम घेता येणार नसल्याचे  म्हटले  आहे

मागील वर्षी यात्रा कमिटी व गावचे सरपंच व इतर ग्रामस्थ यांच्या वारंवार बैठका घेऊन दोन्ही गटामध्ये समझौता करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केलेला होता मात्र दोन्ही गटामध्ये समझौता न झाल्यामुळे गावात यात्रेवेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून देवाचे धार्मिक कार्यक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रम होवू दिले नव्हते. याबाबत पोलीस निरीक्षक फलटण यांनी दिनांक २२ मार्च रोजी गावकरी यांची यात्रेसंबंधाने पोलीस निरीक्षक , फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेमार्फत गावात बैठक  घेण्यात आली  होती सदर बैठकीला  गावातील दोन्ही गटाचे ३०० ते ४०० लोक उपस्थित होते . यावेळी गावकरी यांचेसमोर यावर्षी यात्रेला सर्वांची वर्गणी घ्यायची का? असा विषय निघाला असता दोन्ही गटाचे लोकांनी गोंधळ घातला असून दोन्ही गटात किरकोळ भांडणे झाली . त्याअनुषंगाने गावात दिनांक २२ मार्च रोजी रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवणेत आलेला होता . तसेच उपविभागीय अधिकारी फलटण , उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण , तहसिलदार फलटण , पोलीस निरीक्षक , फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेसमवेत वारंवार बैठक घेऊन सुद्धा यामधून कोणताही समजोता न झाल्याने प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.