साखरवाडी(गणेश पवार)
सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे समाजाला समतेचा संदेश देणारे क्रांतीबा महात्मा फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतिकारक पाऊल उचलत फलटण मधील सावित्रीच्या लेकींच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी फलटण तालुक्यातील तमाम फुलेंप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सकाळी लवकर महात्मा फुले यांना अभिवादन केले सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मा संजीवराजे नाईक निंबाळकर , श्रीराम सहकारी साखरकारखान्याचे चेअरमन डॉ बाळासाहेब शेंडे फलटण चे तहसिलदार मा समीर यादव उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजी गावडे फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड माजी नगरसेवक सचिन भैय्या बेडके मा नगरसेवक पांडुरंग गुंजवटे मा नगरसेवक अशोकराव जाधव माजी नगरसेवक सचिन अहिवळे भाजपा तालुकाध्यक्ष बजरंगनाना गावडे पिंटू इवरे ,आमिरभाई शेख विकास नाळेअमोल भोईटे अमित भोईटे भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते नंदकुमार काकडे वंचीत बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी राजकीय ,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी अभिवादन केले
सकाळी फलटण तसलुक्यातील फुलेंप्रेमींनी व महिलांनी संपूर्ण शहरातून बाईक रॅली काढून जय ज्योती जय क्रांती च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात फुले जयंती साजरी होत असल्याने तालुक्यातील अनेक गावातून फुलेंप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते
क्रांतिसूर्य सेल्फी पॉईंट :
महात्मा फुले चौकात संयोजन समितीने क्रांतिसूर्य अशी अक्षरे लिहलेला सेल्फी पॉईंट तयार केला होता या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच असंख्य फुलेंप्रेमींना झाला . दिवसभर या ठिकाणी प्रचंड गर्दी होती