Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतमध्ये 15 जागांसाठी होणार पोटनिवडणूक potnivdnuk

 


साखरवाडी (गणेश पवार)

फलटण तालुक्यातील डिसेंबर 2022 पर्यंत निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तालुक्यातील एकूण 11 गावांमध्ये  15 जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याचे फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले तालुक्यातील पोटनिवडणूक होणारी गावे पुढील प्रमाणे

गाव           प्रभाग          जागा       आरक्षण


धुळदेव          3                1         सर्वसाधारण स्त्री



गोळेवाडी      1,2,2            1       सर्वसाधारण स्त्री

                                       1       सर्वसाधारण

                                       1        अनुसूचित जाती


ढवळेवाडी(आसू) 1            1        सर्वसाधारण स्त्री


कोळकी            6             1    ना. मा. प्रवर्ग स्त्री

 


शिंदेंमाळ           2             1    ना.मा.प्रवर्ग स्त्री


विडणी             6              1  ना. मा. प्रवर्ग


होळ                2              1 अनुसूचित जमाती


परहर(बु)         1,2            1  सर्वसाधारण 

                                        1 सर्वसाधारण स्त्री


उळुब              2,3              1 अनुसूचित जाती

                                         1 सर्वसाधारण


तावडी             1                  1ना.मा. प्रवर्ग


गुणवरे            3                 1 सर्वसाधारण


पोट निवडणूक  जाहीर झालेल्या ग्रामपंचायतमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू होणार असून या काळात मतदारांवर विपरीत परिणाम करणारी कोणतीही कृती मंत्री, खासदार, आमदार व संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोठेही करता येणार नाही


वरील पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे . तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 18 एप्रिल 2023. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ  मंगळवार दि . 25 एप्रिल ते मंगळवार दि . 2 मे 2023 सकाळी 11 ते दुपारी 3 वा . पर्यंत ( शनिवार दि . 29 , रविवार दि . 30 एप्रिल व सोमवार दि . 1 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून ) . नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) बुधवार दि . 3 मे 2023 रोजी सकाळी 11 वा . पासून छाननी संपेपर्यंत . नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ  सोमवार दि . 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा . पर्यंत . निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ सोमवार दि . 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा . नंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक गुरुवार दि . 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा . पासून सायं . 5.30 वा . पर्यंत . मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक ( मतमोजणीचे ठिकाणी व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील ) शुक्रवार दि . 19 मे 2023. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि . 24 मे 2023 पर्यंत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.