साखरवाडी गणेश पवार
आंदरूड तालुका फलटण येथे विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून दिनांक 10 एप्रिल रोजी फिर्यादी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास दारात तुळशीला पाणी घालत असताना
संशयित सुधीर अण्णा नलावडे (रा नलवडे वस्ती कुरवली बुद्रुक तालुका फलटण) हा तेथे दारू पिऊन आला व तू मला आवडतेस असे म्हणून फिर्यादीला मिठी मारली यावेळी फिर्यादीने आरडा ओरडा केल्याने संशयिताने फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत