Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीत चोरट्यांचा धुमाकूळ एक जखमी दुचाकीचीही चोरी

 


 विडणी -(योगेश निकाळजे) -विडणी व परिसरात काल मध्यरात्री चोरटयांनी अक्षरशा धुमाकूळ घातल्याने या घटनेमध्ये एक जण जखमी झाला असून दुचाकी गाडीही चोरून नेली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

      विडणी ता.फलटण येथे काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हेवस्ती येथील लोकांच्या घरांना चोरांनी बाहेरुन कडी लावून शिवाजी अनंता नाळे यांच्या घरात शिरून चोरीचा प्रयत्न केला मात्र याठिकाणी कोणत्याही मौल्यवान वस्तू आढळून आल्या नसल्याने चोरांचा डाव फसला त्यानंतर त्यांनी शेजारील सचिन शिवाजी नाळे यांची सुमारे एक लाख तीस हजार रुपये किंमतीची होंडा साईन ही गाडी (क्रं.MH11-BR-7387) चोरट्यांनी चोरून नेली आहे.

     त्यानंतर रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास अभंग वस्ती येथील स्वप्नील बाळकृष्ण अभंग यांच्या घराच्या खिडकीतून चोर आत येत असल्याचे त्यांच्या आईला  दिसताच त्यांनी आरडाओरड केल्याने तीन जण तेथून पसार झाले,त्यानंतर चोरांनी आपला मोर्चा काळूखेवस्तीकडे वळवला व रात्री तीन वाजण्याच्या सुमारास रामभाऊ काळूखे यांच्या घरावर हे चोर चढत असल्याचे शेजारील व्यक्तीला दिसल्याने त्यानेही आरडाओरडा केल्याने तेथून चोर पळून जात असतानाच  त्यांना अटकाव करणाऱ्या शशिकांत राजाराम काळूखे यांना चोरटयांनी दगड मारल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे.

     दरम्यान या सर्व घटनांची माहिती विडणीचे पोलिस पाटील सौ.शीतल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली असून पुढील तपास बीट हवालदार अडसूळ व पोलिस हवालदार साबळे करत आहेत.

    विडणी व परिसरात गेल्या दहा दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले असून गेल्या आठवडयात  भैरवनाथ मंदिरासमोरील किशोर जाधव यांच्याही बंगल्यात चोर शिरले होते मात्र त्यांना रोखड व मौल्यवान वस्तू सापडल्या नव्हत्या,चोरीचे सत्र विडणीत सुरूच असून प्रशासनाने यावर कडक उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे, दरम्यान रात्री लोकांनी जागरूक व सतर्क राहण्याचे तसेच काही घटना घडल्यास त्वरीत पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच सागर अभंग व पोलिस पाटील सौ. शीतल नेरकर यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.