साखरवाडी गणेश पवार
राजाळे तालुका फलटण येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी जनावरांची अवैद्य वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पकडला असून तिघा जणांवर गुन्हा दाखल केला असून एकूण 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयित खाजा अब्बास शेख वय 25 राहणार सरडे ता फलटण, रफिक मकबुल शेख वय 22 राहणार सरडे, सोहेल चांद शेख वय 20 राहणार सरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 10 एप्रिल रोजी 4 वाजण्याच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलिसांनी राजाळे गावाच्या हद्दीमध्ये राजाळे -पिंपरद रस्त्यावर जानुबाई मंदिराजवळ पिकअप क्रमांक एम एच 42 एम 41 64 थांबवून पाहणी केली असता यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाच्या तीन जर्सी गाई कत्तल करण्यासाठी चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने भरल्याने संशयतांवर गुन्हा दाखल करून 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चौरे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत