साखरवाडी(गणेश पवार)
सणसर तालुका इंदापूर येथील रायते मळा येथे निरा डावा कालवा आज पहाटे फुटला असून ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.फुटलेल्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे निरा डावा कालव्यावरील रायते मळा येथील मोरीचे दगड निखळल्याने कालवा फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे