विडणी (योगेश निकाळजे )
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरद(ता.फलटण ) यांच्या वतीने आंबेडकर चळवळीला योगदान देणाऱ्या पॅन्थर्सचा आज दिनांक शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पिंपरद ता. फलटण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निरज मोरे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश विठ्ठलराव काकडे असणार आहेत तर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ एक दिवस साजरी न करता वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम, वैद्यकीय शिबीरे, विद्यार्थी मार्गदर्शन शिबीरे, विविध व्यावसायिक प्रशिक्षण शिबीरे याद्वारे साजरी करण्यात येणार आहे. तर डीजे व फटाकेमुक्त भीमजयंती या अभिनव संकल्पनेतून समाजाला वेगळा संदेश दिला जाणार असून डीजे व फटाक्या सारखा नाहक खर्चाला फाटा देत याच बचतीच्या पैशातून मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकतील विध्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य दिले जाणार असल्याचे संस्थेचे सचिव विक्रांत मोरे यांनी सांगितले आहे.
आजसायंकाळी 5 वाजता संपन्न होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सोहळ्यात पारंपरिक वाद्य असणार आहेत. तर बौद्ध भिक्कू संघ व श्रामणेर संघ त्यांचबरोबर समता सैनिक दल व देशाच्या युद्धात शौर्य गाजवणारे महार बटालियनचे सेवानिवृत्त सैनिक या मिरवणूकीत सर्वांचे लक्ष वेधणार आहेत.
महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक,50बौद्ध भिकू संघ, समता सैनिक दल होणार सहभागी