साखरवाडी गणेश पवार
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने सुरवडी येथील सुनंदा बबन जाधव यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रधानमंत्री आरोग्य विभागाकडून तात्काळ तीन लाख रुपयांचे अर्थ सहाय्य मिळाले असून सुरवडीतील सर्व सामान्य कुटुंबातील सुनंदा बबन जाधव यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी अशी
मागणी सुरवडीतील ग्रामस्थ व कुटुंबीयांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे एक महिन्यापूर्वी केली होती याची तात्काळ दखल घेऊन खासदारांनी प्रधानमंत्री आरोग्य विभागाकडे रुग्णाचे सर्व रिपोर्ट व कागदपत्रेदाखल करून तीन लाख रुपयाची लाख रुपयाची मदत मिळवून दिली याबाबत जाधव कुटुंबियांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे आभार मानले