Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरा देवधरच्या पाण्यासाठी आज बैठक baithak

 

संग्रहित चित्र

 साखरवाडी(गणेश पवार) खंडाळा तालुक्यातील वंचित १४ गावांना निरा - देवधरचे पाणी मिळावे , यासाठी कण्हेरी ( ता . खंडाळा ) येथे रविवार दि . १६ रोजी बैठक होणार आहे . तालुका विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे . तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिट , घाडगेवाडी , कर्नवडी , लोहोम , झगलवाडी , लिंबाचीवाडी , कण्हेरी , असवली , अंबारवाडी , पवारवाडी , वाण्याचीवाडी , हरळी , घाटदरे , धावडवाडी ही गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत . या वंचित गावांना लिफ्टद्वारे शेतीला पाणी मिळावे , अशी मागणी जोर धरु लागली आहे . बैठकीला उपस्थित राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.