साखरवाडी (गणेश पवार)
बरड तालुका फलटण येथे विनापरवाना अवैद्य दारू विक्री प्रकरणी कुरवली बुद्रुक येथील एकावर गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, बरड गावाच्या हद्दीमध्ये संशयित पप्पूलाल नाझीर मिटकरी वय 52 राहणार कुरवली बुद्रुक तालुका फलटण हा विनापरवाना अवैध्य दारू विक्री करीत असताना पोलिसांनी त्याच्यावर छापा टाकून त्याच्या ताब्यातील 980 रुपये किमतीच्या 28 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करून त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत