Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माडकर वस्ती (9 सर्कल) येथे भव्य हनुमान जयंतीचे आयोजन झी टॉकीज फेम ह भ प निलेश महाराज कोरडे यांच्या कीर्तनाचे आयोजन jayanti

 


साखरवाडी (गणेश पवार)

जय हनुमान तरुण मंडळ माडकर वस्ती (9 सर्कल) यांच्या वतीने दिनांक 5 व 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंडळाचे हे 28 वे वर्ष आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या भक्ती भावाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हनुमान जयंती साजरी केली जाते यावर्षी दिनांक 5 रोजी सायंकाळी 5ते 6.30 या वेळेत 10 वर्षाखालील मुलांच्या कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे व रात्री 9 ते 11 या वेळेत ह भ प गणेश महाराज खराडे (5 सर्कल) यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे केले असून दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे  भजन, हनुमान जन्म सोहळा, हनुमान चालीसा पठण, महिला भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री 9 ते 11 या वेळेत झी टॉकीज फेम समाज प्रबोधनकार ह भ प निलेश महाराज कोरडे यांच्या कीर्तनाचे आयोजन केले असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद व हनुमान जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन माडकर, उपाध्यक्ष सुरेश माडकर, राजेंद्र इमडे, गणपत माडकर, संतोष माडकर योगेश माडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.