साखरवाडी(गणेश पवार)
फलटण महावितरण विभागाने बाह्य स्त्रोत कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया न राबवल्याने व पूर्वीच्या ठेकेदाराची मुदत 31 मार्च रोजी संपल्याने 1 एप्रिल पासून फलटण विभागातील सर्व कंत्राटी कामगार कामावर हजर नसल्याने शहराबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने महावितरणच्या कारभाराचा फटका सर्वांना बसत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण महावितरण विभागात विविध कामे ही बाह्यस्त्रोत कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मार्फत केली जातात याबाबत आवश्यक असणारी कामाची निविदा काढण्यात येते व यापूर्वीच्या ठेकेदाराची मुदत 31 मार्च रोजी संपल्याने 1 एप्रिल पासून फलटण विभागातील सर्व कंत्राटी कामगार कामावर हजर नाहीत.
महावितरण विभागात विविध कामे ही बाह्यस्त्रोत कर्मचारी वर्गाकडून केली जातात यामध्ये फ्यूज बदलणे, वीज लाईन दुरुस्ती, ट्रांसफार्मर दुरुस्ती, मीटर बदलणे, नवीन वीज जोडणी, बिल वसुली अशी ईतर सर्व कामे केली जातात. महावितरण विभाग दरवर्षी मार्च महिन्यामध्ये बाह्यस्त्रोत कामगारांसाठी निविदा मागवीत असते व जो ठेकेदार निविदेतील अटी व शर्ती पूर्ण करतो त्यास कंत्राट दिले जाते मात्र यावर्षी मार्च महिना संपून गेला तरी महावितरण विभागाने निविदा प्रक्रिया न राबवल्यामुळे कोणत्याही ठेकेदाराने निविदा न भरल्याने एक एप्रिल पासून कंत्राटी कामगारावर कामावर गैरहजर आहेत. यामुळे महावितरण कडील कायम काम करणारे लाईनमन, वायरमन यांच्यावर प्रचंड कामाचा ताण पडला असून एक वायरमन दहा दहा गावांना कसा पुरा पडेल असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात असून महावितरण विभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत.
खंडीत वीज पुरवठ्याच्या ठिकाणचे शेतकरी व नागरिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना फोन करून कामावर येण्याबाबत आग्रह करीत आहेत मात्र कोणाला कोणत्याच ठेकेदाराला कंत्राट न मिळाल्याने व महावितरण कोणतेही लेखी परवानगी नसल्याने अशा ठिकाणी कामावर जाण्याबाबत कंत्राटी कामगार साशंक आहेत यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना व नागरिकांना खंडित वीज पुरवठ्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.