साखरवाडी(गणेश पवार)
सीतामाई घाट वेळोशी रोड येथे साप आडवा आल्याने अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू व एक गंभीर जखमी झाले असून यामुळे पुन्हा एकदा सीतामाई चा घाट चर्चेचा विषय ठरला असून अजून किती किती मृत्यू पाहणार यावर कायमचा तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गाडी चालक स्वप्निल रामचंद्र ढेंबरे वय - 25 व रामचंद्र जयसिंग ढेंबरे वय - 58 दोघे रा - बोडकेवाडी यांना सीतामाई घाट येथे साप आडवा आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला असून या अपघातात रामचंद्र जयसिंग ढेंबरे हे जागीच मृत्युमुखी पडले असून स्वप्निल रामचंद्र ढेंबरे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच अनमोलरत्न ॲम्बुलन्सचे अमोल रोमन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल केले.
सदर प्रकरणाची दखल घेऊन संबधित ठेकेदाराने घाटमाथ्याला सुरक्षा कडे तसेच सुरक्षित रेषा आखणे गरजेचे आहे अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे