साखरवाडी (गणेश पवार)
सुनेला शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर नोकरी लावतो म्हणून 6 लाख 50 हजार व दोन्ही मुलांना पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून खामगाव मधील एकाची 15 लाख 50 हजाराची व याच भागातील इतर चौघांची एकूण 28 लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद शंकर किसन बोंद्रे वय 51 राहणार खामगाव तालुका फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून संशयित ज्ञानेश्वर किसन चिरमे राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार व फिर्यादी शंकर बोंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने फिर्यादीची सून पल्लवी बोंद्रे हिला उपशिक्षणाधिकारी पदावर नोकरी लावतो म्हणून 6 लाख 50 हजार रुपये घेऊन शिक्षण विभागाची परीक्षा पास झाल्याबाबतचे बनावट पत्र ईमेलवर पाठवले तसेच मुलगा सौरभ व ओंकार यांना पोलीस खात्यात भरती करतो म्हणून 9 लाख रुपये घेतले तसेच माझ्या ओळखीचे महादेव ढवळे यांची पुतणी प्रीती संजय ढवळे हिला पोलीस खात्यात भरती करू म्हणून बँक खात्यावर 1 लाख 80 हजार व 1 लाख 20 हजार रोख घेतल्याचे तसेच जगन्नाथ गायकवाड यांचा मुलगा अनिकेत यास पोलीस खात्यात भरती करण्यासाठी 4 लाख 50 हजार रोख व 50 हजार खात्यावर घेतले व चैतन्य हिंदुराव घाडगे याला पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून 4 लाख 50 हजार घेऊन संशयित ज्ञानेश्वर चरणी यांनी आमची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास स पो नि शिंदे करीत आहेत