साखरवाडी गणेश पवार
खामगाव ता फलटण गावाच्या हद्दीत मुरूम- साखरवाडी रस्त्यावर आंब्याच्या चारी येथे दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय आबासो बनकर (वय 40 रा वाखरी तालुका फलटण) हे त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर प्लस क्र एम एच 11 DC 3902 गाडीवरून मुरूम कडून साखरवाडीच्या दिशेने येत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबतची फिर्याद सावता दयाराम बनकर यांनी फलटण ग्रामीण दिली असून पुढील तपास स पो नि शिंदे करीत आहेत